कातळ कडा
संथ ओढा
अंग चिंब
पाऊस वेडा
दाटून काळोख
आला गेला
नभ मेघांचे
रेशीम शेला
शांत पक्षी
क्लांत वारा
हिरवं झाड
बहर आला
गवतफुल
रानभुल
वेडा शहरी
रानभरी झाला
No comments:
Post a Comment