सर्व गाणी
नितळ पाणी
नवा दिवस
नवी कहाणी
शिड फुलले
अवखळ वारा
जन्मापासून
नाही किनारा
शोध घेवू
कुठे कोणाचा
मार्ग सुचेना
अंधार कधीचा
सुरुवात कुठून
आठवणी काही
सर्व बुडाले
थांग नाही
ओल डोळ्यांत
थकलेत पाय
आहे इथेच
अस्तित्व काय...